Chile Forest Fire Latest Update Saam TV
देश विदेश

Chile Forest Fire: चिलीच्या जंगलातील आग अजूनही धूमसतीच; आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू, हजारो घरे जळून खाक

Satish Daud

Chile Forest Fire Latest Update

दक्षिण अमेरिकेतील चिली येथील जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसतच आहे. या आगीत आतापर्यंत हजारो घरे जळून खाक झाली आहे. आगीच्या विळख्यात सापडल्याने ९९ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुमारे १० लाख लोकसंख्या असलेल्या मध्य चिलीतील वालपरिसो प्रदेशातील अनेक भाग शनिवारी धुराच्या लोटाने व्यापले होते. अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. चिलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विना डेल मार या किनारपट्टीवरील पर्यटन शहराच्या आसपासचे भाग प्रभावित झाले आहेत. सर्व बाधित भागात पोहोचण्यासाठी बचाव पथके धडपडत आहेत.

आगीबाबत माहिती देताना चिलीचे गृहमंत्री कॅरोलिना तोहा म्हणाले, की "वालपरिसोमधील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. रस्त्यांवरही जळालेल्या अवस्थेत लोकांचे मृतदेह सापडत आहेत. २०१० च्या भूकंपानंतर चिलीमधील ही सर्वात मोठी आपत्ती आहे. त्यावेळी भूकंपामुळे सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला होता". (Latest Marathi News)

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले की "परिस्थिती सध्या खूपच कठीण आहे. सध्या ही आग ४३ हजार हेक्टरवर पसरली आहे. सध्या आम्ही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करतोय, आतापर्यंत अनेकांना आगीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय".

अहवालानुसार, चिलीच्या ९२ जंगलात आग लागली आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत आहे. त्यामुळे लोक, घरे आणि सुविधांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. चिलीमध्ये उन्हाळ्यात जंगलात आग लागणे सामान्य आहे. गेल्या वर्षी विक्रमी उष्णतेच्या वेळी लागलेल्या आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

SCROLL FOR NEXT