SBI Electoral Bonds Saam Digital
देश विदेश

Electoral Bond: निवडणूक रोख्यांची माहिती अपुरी; सुप्रीम कोर्टाने SBIला पुन्हा फटकारलं

Supreme Court On Electoral Bonds Hearing: आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने अपुरी माहिती दिल्याबद्दल स्टेट बँकेला पुन्हा एकदा धारेवर धरले असून कुठल्या पक्षाला किती दिली याबाबची माहिती सोमवारपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १५ मार्च २०२४

Electoral Bonds:

इलेक्टोरल बाँड म्हणजेच निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले होते. मात्र आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने अपुरी माहिती दिल्याबद्दल स्टेट बँकेला पुन्हा एकदा धारेवर धरले असून कुठल्या पक्षाला किती दिली याबाबची माहिती सोमवारपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत.

इलेक्टोरल बाँड प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने आकडे देण्याचे आदेश दिले असताना आकडे का दिले नाहीत? असा सवाल उपस्थित केला. तसेच कोणी कोणत्या पक्षाला किती रक्कम दिली, याबाबतची माहिती जाहीर करावी, असे निर्देश देत Bond नंबरची माहिती देण्याचे आदेश दिले.

तसेच एसबीआयला (State Bank Of India) बाँडशी संबंधित माहिती देण्यास सांगितले होते. मात्र एसबीआयने बाँड नंबरची माहिती दिलेली नाही. या मुद्द्यावर कोर्टाने नोटीस जारी केली असून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाने सोमवारपर्यंत कोणी कोणाला किती निधी दिला याची माहिती मिळेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) इलेक्टोरल बॉन्डचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केला आहे. 2019 ते फेब्रुवारी 2024 या काळात कोणी किती देणगी दिली याबाबतची माहिती समोर आली आहे. या यादीमध्ये डिअर लॉटरीची कंपनी फ्यूचर गेमिंग पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीने पाच वर्षात १ हजार ३६८ कोटींची देणगी दिली आहे. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर मेघा इंजिनिअरिंग कंपनी आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

SCROLL FOR NEXT