Earthquake in Jammu Kashmir SaamtV
देश विदेश

Earthquake in Jammu Kashmir: मोठी बातमी! उत्तर भारत हादरलं; लडाख, कारगिल भागामध्ये भूकंपाचे धक्के

Earthquake in Jammu Kashmir: सोमवारी (१८, डिसेंबर) उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केल ५.५ इतकी होती.

Gangappa Pujari

Earthquake in Jammu Kashmir:

सोमवारी (18 डिसेंबर) जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केल 5.5 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दुपारी 3:48 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिदू कारगिलमध्ये 10 किलोमीटर भूगर्भात होता. त्याचे धक्के काश्मीरमध्येही जाणवले. त्यानंतर आणखी ३ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे भागातील नागरिक घाबरुन गेले आहेत.

उत्तर भारतातील लडाख, कारगिल भागामध्ये भूकंपाचे आज (सोमवार, १८ डिसेंबर) धक्के जाणवले आहेत. National Center for Seismology च्या माहितीनुसार, हा भूकंप ५.५ रिश्टल स्केलचा आहे. भूकंपाचा पहिला धक्का दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी जाणवला. त्यानंतर लडाखमध्ये दुपारी 4:01 वाजता भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी मोजली गेली.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी ४.०१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ मोजली गेली. त्यानंतर दुपारी ४:१८ वाजता किश्तवाडमध्ये आणखी एक भूकंप झाला. त्याची तीव्रता ३.६ होती. याआधी, सकाळी ११:३८ वाजता पाकिस्तानमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. सतत भूकंपाच्या धक्क्यांमुळे खोऱ्यातील लोक भयभीत झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोनदा भूकंपाचे हादरे जाणवले. दुसरा धक्का पहिल्यापेक्षा कमी तीव्र होता. अनेक ठिकाणी लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. अनेकांनी तात्काळ आपल्या नातेवाईकांना फोन करून भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती दिली आणि त्यांची प्रकृतीही विचारपूस केली.

कशी मोजतात भूकंपाची तीव्रता...

रिश्टर स्केल वापरून भूकंप मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते. ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT