WiFi Router Blast in Kalyan: धक्कादायक! कल्याणमध्ये 'वाय-फाय राऊटर'चा स्फोट; तिघे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

WiFi Router Blast: मोबाईल आणि लॅपटॉपमधील इंटरनेट वापरासाठी 'वाय-फाय राऊटर' हे माध्यम प्रसिद्ध आहे. याच 'वाय-फाय राऊटर'चा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
WiFi Router Blast in Kalyan
WiFi Router Blast in KalyanSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Wifi Router Blast case in kalyan:

सध्या लोकांकडून इंटरनेटचा वापर वाढला आहे. मोबाईल आणि लॅपटॉपमधील इंटरनेट वापरासाठी 'वाय-फाय राऊटर' हे माध्यम प्रसिद्ध आहे. याच 'वाय-फाय राऊटर'चा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी चाळीतील एका घरात वाय-फाय राऊटरचा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

WiFi Router Blast in Kalyan
Navi Mumbai: पोलीस चौकीजवळ झाडावरील दृश्य बघून सगळेच हादरले, बघ्यांची गर्दी जमली, नवी मुंबईत खळबळ

नेमकं काय घडलं?

रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता केबल वाय-फाय राऊटरचा ब्लास्ट झाला. या घटनेत सायम यांची दहा वर्षाची मुलगी नाजमीन ही भाजली आहे.

तिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले. तिच्यावर मिरा रुग्णलायात उपचार सुरु आहेत. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहनारी नगमा अन्सारी ही महिला ८० टक्के भाजली आहे. तर तिचा तीन महिन्याचा लहान मुलगा अरमान हा ५० टक्के भाजला आहे.

WiFi Router Blast in Kalyan
Pune Crime News: सहकारी महिलेला ऑफिसमध्ये घेतलं चुंबन; पुण्यात ७० वर्षीय वृद्धाचं कृत्य

या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com