BJP MLA Vijay Sharma’s Son Aditya Kumar Missing In Jammu Kashmir Saam Tv
देश विदेश

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Jammu BJP MLA Vijay Sharma Son Missing News : जम्मू-काश्मीरमधील भाजप आमदार विजय शर्मा यांचा मुलगा आदित्य कुमार बेपत्ता झाला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही, बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवर शोधमोहीम सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भाजप आमदार विजय शर्मा यांचा मुलगा आदित्य कुमार बेपत्ता

  • बॅडमिंटन खेळण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर आदित्य घरी परतला नाही

  • कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली

जम्मू-काश्मीरमधील हिरानगर मतदारसंघाचे भाजप आमदार आणि अधिवक्ता विजय शर्मा यांचा मुलगा आदित्य कुमार बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. घरातून बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडलेला आदित्य घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून कठुआपासून जम्मूपर्यंत विविध ठिकाणी तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य शर्मा हिरानगर येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. शाळा सुटल्यानंतर तो घरी परतला होता. त्यानंतर संध्याकाळी खेळण्यासाठी तो हिरानगरमध्ये एका ठिकाणी गेला होता. दिवस उलटून गेल्यानंतरही आदित्य घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानांतर आदित्य कुठेही सापडला नाही.

याप्रकरणी शर्मा कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला दरम्यान, आदित्य संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एका बसमध्ये बसून कुठेतरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या माहितीला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या शक्यतेसह इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

आदित्यच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. उशिरा रात्री पोलीस कठुआ बसस्थानकावरही पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, एका बसच्या चालक आणि चालकाला चौकशीसाठी सिटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच इतर संभाव्य ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आदित्यच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणतीही सविस्तर अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. आदित्यचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध शक्यता तपासत असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT