Arunachal Pradesh Assembly Election 2024
Arunachal Pradesh Assembly Election 2024 Saam Tv
देश विदेश

Breaking News: अरुणाचलमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; निवडणुकीपूर्वीच ५ उमेदवार बिनविरोध विजयी, नेमकं कारण काय?

Satish Daud-Patil

Arunachal Pradesh Assembly Election 2024

लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपने अरुणाचल प्रदेशात जोरदार मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरुणाचलमध्ये भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह इतर ३ उमेदवारांचा समावेश आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या या निकालावरून देशाचा मूड लक्षात येतो, असं रिजूजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. (Latest Marathi News)

अरुणाचलमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा असून यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ जूनला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, अरुणाचलमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी (ता. २७) शेवटचा दिवस होता. मात्र, ५ विधानसभेच्या जागांवर फक्त एकाच भाजपच्या उमेदवाराचा अर्ज आला. (Lok Sabha Election 2024)

त्यामुळे या ५ जागांवरील भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालं आहे. विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांचा समावेश आहे. त्याचसोबत राटू टेकी, जिक्की टाको, न्यातो दुकोम आणि मुटकू मिथी यांचा समावेश आहे.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरुणाचलमध्ये एनडीएला तब्बल ४१ जागांवर विजय मिळला होता. तर जनता दल युनायटेड पक्ष ७ जागा, नॅशनल पीपल्स पार्टी ५ जागा, काँग्रेसला ४ जागा आणि अरुणाचल प्रदेश पार्टी फक्त १ जागेवरच विजय मिळवता आला होता. याशिवाय अपक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT