MP suspended parliament winter session SAAM TV
देश विदेश

Parliament MP Suspended: सर्वात मोठी कारवाई! विरोधी पक्षांचे तब्बल ३३ खासदार निलंबित; कारण काय?

Parliament Security Breach: संसद भवनातील घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण ३३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Parliament MP Suspended :

संसद भवनातील घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. संसद सुरक्षेच्या प्रश्नावरुन आजही लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण ३३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत (Loksabha) खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळत आहे.

आजही याच मुद्द्यावरुन लोकसभेत तसेच राज्यसभेत (RajyaSabha) मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई करत ३१ जणांना निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये कॉंग्रेसचे अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, आशिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार यांच्या नावाचा समावेश आहे.

यामधील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याआधीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसेसोबत युती नसताना पोस्टर लावले, हिंगोलीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Success Story: कोण म्हणतंय लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो? घर आणि नोकरी सांभाळत UPSC क्रॅक; IPS तनुश्रीची यशोगाथा!

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

SCROLL FOR NEXT