Samruddhi Mahamarg Accident: पीडित परिवारांना द्या मदत; समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या परिवारांचा मूक मोर्चा

Wardha News : जुलै महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर ट्रॅव्हलच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam tv
Published On

चेतन व्यास
वर्धा
: बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या पीडित परिवारांचा मागील अकरा दिवसांपासून (Wardha) महात्मा गांधी पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरु आहे. आज पिडीत कुटुंबियांच्यावतीने वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. (Samruddhi Mahamarg) अपघाताच्या कारणांची चौकशी करावी, पीडित परिवारांना सरकारने घोषित केलेली आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यासाठी मूक मोर्चा काढला. (Maharashtra News)

Samruddhi Mahamarg Accident
Jalgaon Cyber Crime: झटपट श्रीमंतीचा मोह पडला महागात; तरुणास तीन लाखांत गंडविले

जुलै महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर ट्रॅव्हलच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या परिवाराला मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. या मदतीसाठी वर्ध्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मृतकांच्या कुटुंबीयांचे मागण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणादरम्यान दररोज एक परिवार उपोषणात बसत असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं. या उपोषणात या अपघातात (Accident) मृत्यूमुखी पडलेल्या पुणे, नागपूर, यवतमाळ, (Amravati) अमरावती, वाशीम व वर्धा जिल्ह्यातील मृतकांचे कुटुंबीय सहभागी आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samruddhi Mahamarg Accident
Ahmednagar News : ग्रामस्थांचा अवैध व्यवसायांवर हल्लाबोल; हातभट्ट्या केल्या उध्वस्त, प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त

आज काढण्यात आलेल्या मुकमोर्चात अपघातातील मृतकांचे फोटो घेऊन, काळ्या फित बांधून मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग घेतला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून अपघाताच्या कारणांची चौकशी करावी तसेच मृतांच्या परिवाराला मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. मोर्चात पिडीत कुटुंबियांसोबत वर्धेच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com