Dhanbad Coal Mine Collapse Updates/File Saam TV
देश विदेश

Coal Mine Collapse : धनबादमध्ये कोळसा खाणीत भीषण दुर्घटना; तिघांचा मृत्यू, अनेक मजूर दबल्याची भीती

Nandkumar Joshi

Dhanbad Coal Mine Collapse Updates : झारखंडमधील धनबादनजीक एका कोळशाच्या खाणीत भीषण दुर्घटना घडली. खाणीत अवैधपणे खोदकाम सुरू असतानाच, ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून तीन जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

झारखंडमधील (Jharkhand) धनबादजवळील भोवरा कोलियरी परिसरात शुक्रवारी ही दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोळशाच्या खाणीत खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. अवैधपणे खोदकाम सुरू असताना ढिगारा कोसळला. त्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धनबादपासून २१ किलोमीटरवर असलेल्या बीसीसीएलच्या भोवरा कोलियरी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. या खाणीत अवैधपणे खोदकाम सुरू होते, अशी माहिती समजते.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किती जण मरण पावले किंवा ढिगाऱ्याखाली किती जण दबले आहेत हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. बचाव आणि मदतकार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच नेमकी आकडेवारी सांगता येणार आहे.

काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही कोळसा खाण अवैध असून, तिथं खोदकाम सुरू असताना ढिगारा कोसळला. त्याखाली अनेक जण दबले गेले आहेत. बरेच मजूर हे स्थानिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर स्थानिक मदतीसाठी धावून गेले. त्यांनी ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्या तिघांनाही मृत घोषित केले, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली. कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT