Boycott Effect On Maldives Tourism Saam Digital
देश विदेश

Boycott Effect On Maldives Tourism: भारतीयांच्या बहिष्काराचा परिणाम, मालदीवला दररोज इतक्या कोटींचा तोटा

Boycott Effect On Maldives Tourism: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला असून मालदीवला दररोज करोडो रुपयांचा फटका बसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boycott Effect On Maldives Tourism

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला असून मालदीवला दररोज करोडो रुपयांचा फटका बसत आहे. ज्या देशाचा महसूल ज्या देशाचा महसूल केवळ पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो, त्या देशाची अवस्था बिकट होते हे उघड आहे. बायकॉटच्या निर्माण झालेल्या ट्रेंडनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तेथील प्रवासाचा खर्च निम्म्यावर आणला आहे, तरीही भारतीय पर्यटक मालदीवमध्ये जाण्यास तयार नाही आहेत. त्यामुळे मालदीव सरकार अडचणीत आलं आहे.

मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून सुरू झालेल्या संपूर्ण वादापूर्वी मालदीव हे भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ होते. लाखो भारतीय दरवर्षी मालदीवला भेट देत असतात. मात्र भारतीय पर्यटकांनी बहिष्कार टाकल्यामुळे स्वता मालदीवनेच आपली ४४ हजार कुटुंबे अडचणीत आल्याचं म्हटलं आहे. भारतीय पर्यटकांच्या नाराजीमुळे मालदीवच्या पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम झाला आहे. पर्यटकांनी ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलवरही मालदीवला भेट देण्याचे पर्याय शोधणं बंद केलं असून लक्षद्वीपचा शोध ३४ पटीने वाढल्याची माहिती आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT