कोलकाता : कुटुंबाचा अपमान झाला म्हणून एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे मात्र आत्महत्या करण्यापूर्वी या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या करण्याअगोदर फेसबुक लाईव्ह (Facebook Live) केलं आणि आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील (West Bengal) असून या घटनेनंतर परगाना जिल्ह्यामधील बकखाली परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे. 8 जानेवारीला एका जंगलात जात कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
आत्महत्य़ा केलेल्यांमध्ये पती अशोक नस्कर, पत्नी रिता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर यांचा समावेश आहे. मात्र पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अशोक रिता यांची मुलगी पूनम नस्कर ही एका संस्थेशी जोडलेली असून तिच्यावरती त्या संस्थेचे 14 लाख रुपयांचा गफला केल्याचा आरोप (Allegations) आहे. आणि याच प्रकरणात 8 जानेवारीला पुनमच्या संस्थेमधील काही महिला तिच्या घरी आल्या होत्या या महिलांनी पूनम आणि तिच्या घरच्यांना अपमानित केलं होतं.
हे देखील पहा -
स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढतं तिला घेऊन गेले. आणि घरातील सदस्यांनाही घराबाहेर काढून घर बंद केलं. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, पूनमसह तिच्या पतीला दोरीने बांधून गावभर फिरवून त्यांना मारहाण केली आणि या अपमानामुळेच नस्कर कुटुंबातील य़ा 3 सदस्यांनी जंगलामध्ये (Forest) आत्महत्या केली. दरम्यान या घटनेचा फेसबुक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागला तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती कळाली. पोलिसांनी या प्रकरणात स्वनिर्भर संस्थेच्या 5 महिलांना अटक केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.