Yulu Wynn Electric Scooter
Yulu Wynn Electric Scooter Social Media
देश विदेश

Electric Scooter: फक्त 999 रुपयांत बुक करा इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या Yulu Wynn ची किंमत आणि फीचर्स

Priya More

Yulu Wynn Electric Scooter: सध्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापाठोपाठ एक नवीन इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये आणत आहेत. सध्या मार्केटमध्ये जबरदस्त फीचर्ससह इलेक्ट्रिक स्कूटर येत आहेत. अशातच Yulu कंपनीने मार्केटमध्ये जबरदस्त स्कूटर लाँच केली आहे.

Yulu कंपनीने नुकताच Yulu Wynn ही स्कूटर लाँच केली आहे. या कंपनीने लाँच केलेले हे पहिलं वाहन आहे. अगदी स्वस्तात तुम्ही ही स्कूटर खरेदी करु शकता. कंपनीने या स्कूटरची सुरुवातीची किंमत 55,555 रुपये इतकी ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने या स्कूटरसाठी अधिकृत बुकिंग सुरु केली असून फक्त 999 रुपयांमध्ये तुम्ही ही स्कूटर बूक करु शकता. बुकिंगसाठी दिलेले पैसे रिफंड मिळणार आहेत. याच महिन्यात कंपनी या स्कूटरची डिलिव्हरी सुरु करण्याची शक्यता आहे.

Yulu कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर कमी किंमतीत लाँच केली आहे. पण भविष्यात या स्कूटरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने या स्कूटरला कॉम्पॅक्ट डिझाईन दिले आहे. कंपनीने ही स्कूटर तरुणांना आवडेल अशा पद्धतीने तयार केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स (CMVR) अंतर्गत लो स्पीड व्हेइकल कॅटेगरीअंतर्गत येते. याचाच अर्थ ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनची गरज नाही आणि ड्रायव्हिंग लायसन्सची देखील गरज नाही.

या स्कूटरच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने या स्कूटरमध्ये 15 व्होल्ट 19.3Ah च्या क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. एका चार्जिंगमध्ये ही स्कूटर 68 किलो मीटरपर्यंत धावणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या स्कूरटचे वजन 100 किलो आहे. ही स्कूटर मूनलाइट व्हाइट आणि स्कारलेट रेड या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये BLDC इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 24.9 ताशी किलो मीटर आहे. तसंच या स्कूटरमध्ये स्पैलेबल बॅटरी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही बॅटरी बदलण्यासाठी फक्त एका मिनिटाचा कालावधी लागतो, असा दावा कंपनीने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT