Bageshwar Baba News: बागेश्ववर बाबावर बिहारमध्ये गुन्हा दाखल; स्वत:ला देव सांगून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप

Bageshwar Baba News: बागेश्वर बाबाच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर एसीजेएम कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bageshwar Baba News
Bageshwar Baba NewsSaam tv

Bageshwar Baba News: बागेश्वर धामच्या बागेश्वर बाबा पुन्हा अडचणीत आला आहे. बागेश्वर बाबाच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर एसीजेएम कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागेश्वरने लोकांना देव असल्याचे सांगून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

बागेश्वर बाबाच्या विरोधात वकील सूरज कुमार यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. वकील सूरज यांनी आरोप केला आहे की, 'बागेश्वर बाबाने स्वत:ची तुलना हनुमानजीशी तुलना केली होती आणि देवाशीही तुलना केली होती. बागेश्वर बाबा हा लोकांची दिशाभूल करत आहे'.

Bageshwar Baba News
Santosh Bangar News: काढली का मिशी! जाहीर आव्हानाने संतोष बांगर यांची केली चांगलीच पंचाईत; राष्ट्रवादीने साधला निशाणा

बागेश्वर बाबाची देवाशी तुलना

'बागेश्वर बाबा हा देवाशी तुलना करून अपमान करत आहे. चमत्काराचा दावा करत लोकांची लुटमार करत आहे. बागेश्वर बाबाच्या कृत्यामुळे सनातन धर्माच्या परंपरेचा अपमान होत आहे', असेही वकील सूरज कुमार यांचं म्हणणं आहे.

गुन्हा दाखल

बागेश्वर बाबाच्या विरोधात २९५, ५०५, २९८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १० मे २०२३ रोजी सुनावणी होणार आहे.

Bageshwar Baba News
Accident News : गुळाची ढेप समजून महिलेने चक्क बॉम्ब फोडला अन्...; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

बागेश्वर बाबावरून राजकारण

दरम्यान, बागेश्वर बाबा बिहार येण्याआधीच राजकारण सुरू झालं आहे. बागेश्वर बाबाला गांधी मैदानात कार्यक्रमासाठी जागा न मिळाल्याने गिरिराज सिंह यांनी निशाणा साधला आहे.

गिरिराज सिंह यांनी म्हटले की, 'नितीश कुमार यांनी इतर धर्मीयांच्या कार्यक्रमात काय केलं, याच्यावर माझा काहीच आक्षेप नाही. मात्र, भक्तांना रोखलं तर सर्व बाबींचा हिशोब घेऊ'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com