Golden Temple Bomb Blast Twitter/@ANI
देश विदेश

Amritsar News: अमृतसर हादरले! सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा स्फोट; एक जण जखमी

Amritsar News: 32 तासांनंतर सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा एकदा स्फोट

Shivani Tichkule

Punjab News: पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आणखी एक स्फोट झाला. यापूर्वी देखील गेल्या शनिवारी या परिसरात स्फोट झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 32 तासांनंतर सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. (Latest Marathi News)

श्री हरिमंदिर साहिब जवळील हेरिटेज स्ट्रीट परिसरात आज सकाळी 6:30 वाजता पुन्हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

या घटनेत एक जण जखमी झाला. शनिवारी रात्री उशिरा ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच ठिकाणी हा स्फोट झाला. सध्या पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी हजर आहे. हा स्फोट नेमका कोणत्या प्रकारचा होता, याबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांनी अनेक नमुने ताब्यात घेतले आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे एक कारही उभी होती, ज्याच्या काचा फुटल्या होत्या. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलीस (Police) करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट झाला होता. या स्फोटामुळे सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा फुटल्याने 5 ते 6 भाविक जखमी झाले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Punjab News)

सध्या या घटनेनंतर अमृतसर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने आजूबाजूचा परिसराची तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

World Cup 2025: चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

SCROLL FOR NEXT