Bollywood Singer Fazilpuria  Saam Tv News
देश विदेश

Bollywood: प्रसिद्ध गायक अन् नेत्यावर भररस्त्यावर गोळीबार; चारचाकीवरून काढला पळ, नेमकं काय घडलं?

Bollywood Singer: हरियाणवी व बॉलिवूड गायक राहुल फाजिलपुरिया यांच्यावर गुरूग्राममधील एसपीआर रोडवर गोळीबार झाला. सुदैवाने ते बचावले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

हरियाणवी आणि बॉलिवूड सिंगर राहुल फाजिलपुरिया यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राममधील एसपीआररोडवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने राहुल थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एसपीआर रोडवरून राहुल चारचाकी वाहनातून जात होते. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. तसेच गोळीबार केला. यावेळी राहुल यांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला. याची माहिती गुरूग्राम पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. किंवा कोणत्या वाहनाला गोळी लागलेली नाही.

घटनेनंतर गुरूग्राम पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या चौकशी सुरू आहे. या ठिकाणी गोळीबार झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

फाजिलपुरिया हे गायक असण्यासोबत रॅपरही आहेत. हरियाणवी गाणी गाण्यासाठी त्यांची ओळख आहे. याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. कपूर अँड सन्स (लडकी ब्युटीफुल), लल्ला लोरी, बिल्ली बिल्ली, या गाण्यांमुळे त्यांना बॉलिवूड खूप ओळख मिळाली. हरियाणामध्ये त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.

राहुल फाजिलपुरिया यांचं खरे नाव राहुल यादव आहे. ते गुरूग्राममधील फाजिलपूर झारसा या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी २०२४ साली लोकसभा निवडणूक लढवली होती. जननायक जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी गुरूग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील कोणकोणती राज्ये अरबी समुद्राला लागून आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT