Bollywood News, Jayaprada Saam Digital
देश विदेश

Bollywood News, Jayaprada: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट, काय आहे संपूर्ण प्रकरण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood News, Jayaprada

कधीकाळी आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. १७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असून याकडे लक्ष लागलं आहे.

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी २०१९ मध्ये जयाप्रदा यांच्याविरोधात स्वार कोतवाली, रामपूर येथे गु्न्हा दाखल करण्यात आला होता. आमदार-खासदार न्यायालयात या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. रामपूमधून जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरही नूरपूर गावात त्यांनी एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. याची माहिती प्रभारी अधिकारी निरज पाराशरी यांनी पोलिसांना दिल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची खूप चर्चाही झाली होती. सोशल मीडियावरही पडसाद उमटले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आमदार खासदार न्यायालयाने यावर जयाप्रदा यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावलं होतं. मात्र, त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. बुधवारीही त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत त्यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असून १७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान यावेळीतरी जयाप्रदा न्यायालयात उपस्थित राहून बाजू मांडणार का याकडे लक्ष लागलं आहे.

या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जयाप्रदा चर्चेत आहेत. सध्या आचारसंहिता भंग केल्याचं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या सध्या राजकारणात सक्रीय असल्यातरी त्यांच्या अभिनयामुळे त्यांचे अनेक चाहते आहे. दरम्यान या प्रकरणामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

SCROLL FOR NEXT