SMVT railway station in Bengaluru ANI
देश विदेश

Crime News : रेल्वे स्थानकावर ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह; CCTV फुटेजमध्ये दिसून आलं धक्कादायक दृश्य...

Bengaluru Crime News : बेंडालुरू जिल्ह्यातील बैयप्पनहल्ली येथे सर एम विश्वेश्वरैया टर्मिनल (SMVT) येथे रेल्वे फलाटावर मंगळवारी एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.

साम टिव्ही ब्युरो

Bengaluru Crime News : कर्नाटकात धक्कादायक घटना घडली आहे. बेंडालुरू जिल्ह्यातील बैयप्पनहल्ली येथे सर एम विश्वेश्वरैया टर्मिनल (SMVT) येथे रेल्वे फलाटावर मंगळवारी एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये ठेवून तो रेल्वे स्थानकात ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे ३१ ते ३५ वर्षे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह असलेला ड्रम तिघा जणांनी रिक्षातून आणला होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.  (Latest Marathi News)

या घटनेने कर्नाटकात (Karnataka) खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे. ड्रम नेणारे आणि तो रेल्वे स्थानकात (Railway Station) फेकून पसार होणाऱ्या तिघा जणांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे.

रेल्वे पोलीस अधीक्षक सौम्यलता यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, तिघा जणांचा शोध घेण्यात येत आहे.

हत्येचा गुन्हा दाखल

रेल्वे पोलिसांनी (Railway Police) सांगितले की, मृत महिलेचे वय अंदाजे ३१ ते ३५ वर्षे असावे. तिची ओळख पटवण्यात येत आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. (Crime News)

तीन महिन्यांतील तिसरी घटना

गेल्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात याच रेल्वे स्थानकावर एका पॅसेंजर ट्रेनच्या डब्यात पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. गोणीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. याबाबत एका प्रवाशाने तक्रार केली होती. अन्य वस्तूंसह ही गोणीही डब्यात ठेवण्यात आली होती.

४ जानेवारीलाही यशवंतपूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिचा मृतदेह आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणममधून आणून रेल्वे स्थानकात फेकण्यात आला होता, असे तपासात समोर आले होते. या तिन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याबाबत काहीही माहिती कळू शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT