Mumbai yellow line Metro  Saam Tv
देश विदेश

Metro Yellow Line : खुशखबर! मेट्रोच्या यलो लाईन कधीपासून सुरु होणार? महत्वाची माहिती समोर

Banglore Metro Yellow Line : बेंगळुरू मेट्रोची यलो लाईन १५ ऑगस्टपूर्वी सुरू होण्याची शक्यता असून सध्या चालकविरहित ट्रेनसाठी सुरक्षा तपासणी सुरू आहे. बीएमआरसीएलकडून अंतिम मान्यतेसाठी सीएमआरएसकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

Alisha Khedekar

यलो लाईन सुरू करण्यासाठी जनतेच्या वाढत्या मागण्यांदरम्यान, बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) चे व्यवस्थापकीय संचालक महेश्वर राव यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक सिटी मार्गे आरव्ही रोड ते बोम्मासंद्रा यांना जोडणारा १९ किमीचा मार्ग १५ ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, असे म्हटले.

शनिवारी लालबाग येथे मुख्य गेटवर बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या, बंगळुरू मध्यचे खासदार पीसी मोहन आणि इतर भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली निघाली.यलो लाईन ना ओपन माडी” (यलो लाईन उघडा) या घोषणेखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये, दीर्घकाळापासून रखडलेला कॉरिडॉर त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

यावर राव यांनी म्हटले की, "सध्या, आमच्याकडे तीन गाड्या आहेत, त्यापैकी तिसरी ट्रेन गेल्या महिन्यात आली आहे. या स्वयंचलित ट्रेन ऑपरेटिंग सिस्टीम असल्याने, एक स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन चाचणी सुरू आहे जी या चालकविरहित गाड्यांच्या सुरक्षा नियंत्रणांची तपासणी करेल. या सगळ्याचा आम्हाला ७ जुलैपर्यंत अहवाल अपेक्षित आहे. "

त्यांनी पुढे स्पष्ट केले की "पुढील आठवड्यात मूल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यानंतर, बीएमआरसीएल आवश्यक मंजुरीसाठी मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) शी संपर्क साधेल, ज्यासाठी किमान एक महिना अधिक लागू शकतो. सध्याच्या गाड्यांची उपलब्धता पाहता, बीएमआरसीएल फक्त तीन गाड्यांसह काम सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्या २० मिनिटांच्या अंतराने धावतील आणि पाच ते सहा स्थानकांवर थांबतील. शिवाय मेट्रो नेटवर्कमध्ये ३१ स्थानके असलेल्या दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरमधून ४४.६५ किमीचा प्रवास केला जाईल आणि त्यासाठी १५,६११ कोटी रुपये खर्च येईल.असेही राव म्हणाले. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT