Emergency services at the mosque in Jakarta after an explosion during Friday prayers. saam tv
देश विदेश

Blast In Mosque: नमाजावेळी मशिदीमध्ये स्फोट, ५४ जण जखमी, घटनास्थळी सापडली AK-47

Indonesian Mosque Blast: इंडोनेशियामध्ये शुक्रवारच्या नमाजावेळी एका मशिदीमध्ये भीषण स्फोट झाला. यात ५० पेक्षा हुन अधिक जण जखमी झालेत. हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास आता केला जात आहे. या स्फोटाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

  • नमाजावेळी भीषण स्फोट

  • स्फोटात ५४ जण जखमी

  • पोलिसांकडून स्फोटाचा तपास सुरू

इंडोनेशियातील जकार्ता येथील एका शाळेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मशिदीत नमाज पठण सुरू असताना एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जकार्ता येथील पोलीस प्रमुख असेप एडी सुहेरी यांनी पत्रकार परिषदेत या स्फोटाबाबत माहिती दिली.

उत्तर जकार्ता येथील केलापा गाडिंग येथे स्फोट झाला असून तो कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांच्या मते रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्याची संख्या ५४ होती. यातील काहींची स्थिती गंभीर आहे. रॉयटर्सने वृत्त दिले आहे की मशिदीचे फारसे नुकसान झाले नाही.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात घटनेच्या ठिकाणी अनेक वस्तू सापडल्या आहेत. यात बुलेटप्रुफ जॅके्टस, बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य तसेस रायफल्सचा समावेश आहे. दरम्यान स्फोटामुळे मशिदीचं कोणतेही मोठे नुकसान झाले नाहीये. जखमींना शोधण्यासाठी नातेवाईकांना मदत व्हावे यासाठी सेम्पाका पुतिह इस्लामिक आणि यार्सी हॉस्पिटल्समध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

SCROLL FOR NEXT