काळी जादू केल्याच्या संशयावरून एका सायको किलरने २ मित्र आणि वॉचमॅनची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीला असा संशय होता की, त्याचे २ मित्र त्याच्यावर काळी जादू करत आहेत. याच कारणामुळे आरोपीने त्याच्या मित्रांची हत्या केली आणि त्यांचे गुप्तांगही कापले. यासह अय्यपा मंदिरातील वॉचमनचीही त्याच पद्धतीने हत्या केली. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी सायको किलरला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक नायर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो केरळ येथील रहिवासी असून, त्याने आयआयटी इंजीनियरिंग पूर्ण केली आहे.
२३ एप्रिल रोजी आरोपी भिलवाडीच्या सुभाष नगर येथील अय्यपा मंदिरात गेला. तिथे त्याने आधी वॉचमॅन लालसिंग रावण राजपूत याचे गुप्तांग कापले. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी दीपकला ताब्यात घेतले. पोलिसांनी दीपकच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात २ मृतदेह सापडले.
मृतदेहावर काही जळालेल्या जखमा होत्या. हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी आरोपीला २ जणांच्या हत्येबद्दल माहिती विचारली असता, त्याने २ मित्र काळी जादू करत होते, त्यामुळे खून केल्याची माहिती दिली. आरोपीने कबूल केले की, त्याने त्याच्या २ मित्रांसोबत आधी दारू पार्टी केली. नंतर मित्रांची निर्घृण हत्या केली. तसेच मित्रांचे गुप्तांगही कापले.
डीएसपी सिटी मनीष बडगुजर यांनी या घटनेसंदर्भात सांगितले की, सायको किलर दीपक हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर आधीही ६ ते ७ गुन्हे दाखल आहेत. दीपकने आणखी कुणाची हत्या केली आहे का? या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.