मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह उद्या होणार शपथविधी
Mohan Charan Majhi Saam Tv
देश विदेश

New Odisha CM: ओडिशात पहिल्यांदाच भाजप सरकार! मोहन चरण माझी नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Satish Kengar

मोहन चरण माझी यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. ते ओडिशाचे 16 वे मुख्यमंत्री असतील. माझी हे ओडिशाचे आदिवासी मुख्यमंत्री असतील. याशिवाय भाजप सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही असतील. ओडिशाच्या भाजप सरकारमध्ये केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील.

उद्या म्हणजेच 12 जून रोजी ओडिशाच्या नव्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. 53 वर्षीय मोहन माझी हे आदिवासी समाजातील आहेत.

माझी हे केओंझार विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते त्यांच्या जनसेवा आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री उमेदवार मोहन माझी यांनी बीजू जनता दलाच्या (बीजेडी) मीना माझी यांचा केओंझर विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता.

दरम्यान, 147 सदस्यीय ओडिशा विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. ओडिशाच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली ज्यामध्ये मोहन मांझी यांची ओडिशाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. नवीन सरकार 12 जून रोजी शपथ घेणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: झाडू वापरताना चुका नका करू , नाहीतर येईल दारिद्र्य

Zika VIDEO: झिकाकडे दुर्लक्ष कराल,जीवाला मुकाल? महिलांना सर्वात जास्त धोका? जाणून घ्या लक्षणे

VIDEO: ठाकरे शिंदेंना धक्का देणार? नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी काय आहे मास्टर प्लॅन? जाणून घ्या

Sharad Pawar-Rahul Gandhi: पवारांचा राहुल गांधींना वारीचं निमंत्रण...

Zika Virus News: सावधान! राज्याला झिकाचा विळखा

SCROLL FOR NEXT