BJP Leader Killed in Karnataka :  Saam tv
देश विदेश

BJP Leader Killed : भाजपच्या आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; पोलिसांनी सांगितलं धक्कादायक कारण

BJP Leader Killed in Karnataka : भाजपच्या आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या झालीये. नेत्याच्या हत्येमागचं धक्कादायक कारण पोलिसांनी सांगितलं आहे.

Vishal Gangurde

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वेंकटेशन कुरुबारा यांची हत्या

या घटनेमुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता

याआधी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि ओडिशामध्येही भाजप नेत्यांच्या हत्या

BJP Yuva Morcha President Kills : कर्नाटकातील गंगावतीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष वेंकटेशन कुरुबारा यांची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून वेंकटेशन यांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि ओडिशानंतर आता कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. भाजप नेत्यांच्या हत्यांच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेत्याच्या हत्येची घटना कर्नाटकातील शकगंगावतीमध्ये घडली. भाजप नेते लीलावती एलुबू किलू रुग्णालयाजवळ एका कामानिमित्त उभे होते. त्याचवेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. सुरुवातीला त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्यानंतर बेदम मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वेंकटेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी संशय व्यक्त करत म्हटलं की, जुनं वैमनस्य आणि गँगवॉरमुळे हत्या झाल्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मृत भाजप नेत्याच्या गुन्हेगारीचा रेकॉर्डही शोधला जात आहे. हत्याकांडानंतर पोलिसांकडून आजूबाजू्ला असलेले सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या हत्याकांडातील संशयीत आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्याकांडातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल. या घटनेप्रकरणी भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनीही शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Cut: नवीन वर्षात खुशखबर! CNG आणि PNG च्या किंमती झाल्या कमी; किती होणार फायदा?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

Hatgad Fort : हतगड किल्ला ट्रेकर्ससाठी भटकंतीचं खास ठिकाण, वीकेंडला नक्की जा

Samsaptak Yog: 2 दिवसांनी शक्तीशाली गुरु बनवणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभ

Ladki Bayko Yojana : लाडकी बहीण नव्हे, लाडकी बायको योजना! काँग्रेसच्या माजी मंत्र्याची भाजपच्या बड्या नेत्यावर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT