BJP Wins In Guwahati Municipal Corporation Election Saam TV
देश विदेश

GMC Election Result 2022: गुवाहाटी महापालिकेत पुन्हा BJP; 'आप'ची एंट्री

यापुर्वी तीन जागा भाजपने बिनविराेध जिंकल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

गुवाहाटी : गुवाहाटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Guwahati Municipal Corporation Election) ५७ वॉर्डांपैकी ४३ वॉर्डांमध्ये भारतीय जनता पक्षाने (bjp) विजय मिळविला आहे. त्यांचा मित्रपक्ष असम गण परिषद (एजीपी) पाच जागांवर विजयी झाली आहे. दरम्यान भाजपला साथ दिल्याने पतंप्रधान नरेंद्र माेदींनी (Narendra Modi) ट्विट (tweet) करुन जनतेचे आभार मानले आहेत. (Guwahati Municipal Corporation Election Result Marathi News)

गुवाहाटी महानगरपालिकेच्या ६० पैकी ५७ वॉर्डांत शुक्रवारी (ता.२२) ५२.८० टक्के इतके मतदान झाले होते. आज (रविवार) सकाळपासून मतमाेजणी सुरु आहे. यंदा काँग्रेसने सर्वाधिक ५४, सत्ताधारी भाजपने ५०, आम आदमी पार्टीने (आप) ३९ आणि आसाम राष्ट्रीय परिषदेने २५ जागांवर निवडणुक लढविली हाेती. भाजपचा मित्र पक्ष असम गण परिषदेने (एजीपी) भाजपसोबतच्या जागा वाटपाच्या व्यवस्थेनुसार सात प्रभाग लढवले.

४३ जागांवर भाजपचे वर्चस्व

आत्तापर्यंत ५७ पैकी ४३ जागांवर भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच भाजपचा मित्र पक्ष असम गण परिषदेने पाच जागा जिंकल्या आहेत. याबराेबरच आम आदमी पार्टी आणि आसामी जातीय परिषदेने एका जागेवर विजय नाेंदविला आहे.

पंतप्रधान माेदींनी जनतेचे मानले आभार

गुवाहाटी येथील निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जनतेचे ट्विट करुन आभार मानले आहेत. ते लिहितात शहरातील जनतेने जबरदस्त जनादेश दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मेहनतीलाही जनतेने आशीर्वाद दिला आहे. मुख्यमंत्री आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले असे म्हणत आभार देखील मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT