Congress Vs BJP  Saam Tv
देश विदेश

BJP Vs Congress: भाजपला धक्का, काँग्रेसला बुक्की; अमित शहांविरोधातील आंदोलनादरम्यान संसदेबाहेर नेमकं काय घडलं?

Parliament Winter Session: संसदेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत होते. मात्र याठिकाणी अचानक राडा झाला आणि भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस खासदार आमने-सामने आले.

Priya More

तन्मय टिल्लू, साम टीव्ही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या विधानामुळे संसदेत मोठा गोंधळ झाल्यानंतर आता संसदेबाहेरही भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा राडा झाला. संसदेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत होते. मात्र याठिकाणी अचानक राडा झाला आणि भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्यामुळे जखमी झाल्याचा आरोप सारंगींनी केलाय. नेमका काय राडा झाला ते आपण पाहणार आहोत...

दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी पडली असली तर संसदेतील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक एकमेकांना घाम फोडतायत. संसदेबाहेर खासदारांची डोकीही फुटली. त्याचं झालं असं की लोकसभेत गृहमंत्री अमित शाहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधकांनी संसद परिसरात आंदोलन केलं. मात्र यादरम्यान सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले. सारंगी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय.

इंडिया आघाडीच्या खासदारांकडून संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. खासदारांकडून आंबेडकरांचा फोटो हाती घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. संसद परिसरातील मकर द्वाराजवळ भाजप-काँग्रेसचे खासदार उभे असताना गदारोळ झाला. राहुल गांधींनी धक्का दिल्याचा भाजप खासदार प्रताप सारंगींनी आरोप केला. भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून रोखल्याचा राहुल गांधींचा दावा आहे.

तर भाजप खासदार अजित गोपछडेंनी घडलेल्या प्रकारात राहुल गांधींचा उद्दामपणा असल्याचं म्हटलं. दुसरीकडे नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधींनी भावाची बाजु सावरलीये. हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय..अमित शाहंच्या आंबेडकरांवरील विधानानंतर काँग्रेससह इंडिया आघाडी आक्रमक झालीये..मात्र लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात संसदेच्या पायऱ्यांवर अशी धक्काबुक्की होत असेल तर आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासाठी हे अशोभनीय आहे एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT