BJP Election Commission of India saam tv
देश विदेश

Election Commission : भाजप मतांची चोरी करतेय, गुजराती लोक बिहारचे व्होटर; माजी उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

BJP Election Commission : देशातील विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. आता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

Yash Shirke

  1. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर गुजरातचे लोक बिहारचे मतदार बनवून फसवणूक केल्याचा आरोप केला.

  2. भाजपचे प्रभारी भिखुभाई दलसानिया यांनी २०२४ मध्ये गुजरातमध्ये मतदान केले असूनही ते पटनाचे मतदार असल्याचे तेजस्वी यांचे म्हणणे.

  3. मुझफ्फरपूरच्या महापौरांकडे एकाच मतदारसंघात दोन EPIC क्रमांक असल्याचा आरोप; निवडणूक आयोग भाजपशी संगनमत करत असल्याचा दावा.

Election Commission of India : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत. गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील इतर नेते देखील निवडणूक आयोगावर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही आयोगावर निशाणा साधला आहे. गुजरातचे लोक बिहारचे मतदार कधीपासून होऊ लागले, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'आता गुजरातचे लोक बिहारचे मतदार होत आहेत. भाजपचे प्रभारी भिखुभाई दलसानिया पटनाचे मतदार झाले आहेत. त्यांनी २०२४ मध्ये गुजरातमध्ये शेवटचे मतदान केले होते. ते अजूनही पटनाचे मतदार आहेत. गुजरातमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आले, पण पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच जागा बदलून त्यांनी मतदान करायला सुरुवात केली. बिहार निवडणुका संपल्यावर, त्यांची नावे वगळल्यानंतर ते कुठे जातील? हे षडयंत्र सुरु आहे, जे सर्वांनी समजून घ्यायला हवे. निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजप मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत आहे.'

'मुझफ्फरपूरच्या महापौर निर्मला देवी यांच्याकडे एकाच विधानसभा मतदारसंघात एक नाही तर दोन EPIC क्रमांक असलेले ओळखपत्र आहे. त्या बिहारमधील प्रमुख नेत्यांपैकी एक आङेत. निवडणूक आयोग भाजपशी संगनमत करुन मोठे षडयंत्र रचत आहे. निवडणुकीदरम्यान भाजपला मदत करण्यासाठी हे काम केले जात आङे. विरोधी पक्षांच्या मतदारांना आणि गरीब मतदारांना मृत घोषिक केले जाते आहे, त्यांची नावे वगळली जात आहेत', तेजस्वी यादव म्हणाले.

'सर्वोच्च न्यायालयात SIR प्रकरण सुरु आहे. काल ज्यांची नावे SIR मध्ये मृत म्हणून नोंदवण्यात आली होती, त्यांना न्यायालयात जिवंत सादर करण्यात आले. ही एक गंभीर बाब आहे. यालाच लोक मतांची चोरी म्हणत आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग मतांची चोरी करत आहेत. आता सत्य बाहेर येत आहे, तेव्हा भाजप गप्प आहे. पूर्वी सीबीआय आणि ईडीचा वापर निवडणुकीत हेराफेरीसाटी केला जात असे. आता या एजन्सी अयशस्वी झाल्यानंतर निवडणूक आयोगाला पुढे आणण्यात आले', असे वक्तव्य बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT