VETERAN BJP LEADER SHYAM BAHADUR SINGH GAUTAM DIES AT 92 saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

Veteran BJP Leader Shyam Bahadur Singh Gautam Dies At 92: अमेठीमध्ये भाजपचे संग्रामपूरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आरएसएसचे समर्पित स्वयंसेवक श्याम बहादूर सिंह गौतम यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजप कार्यकर्ते आणि परिसरात शोककळा पसरली.

Omkar Sonawane

अमेठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे संग्रामपूरचे माजी जिल्हाअध्यक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक श्याम बहादूर सिंह गौतम यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप कार्यकर्त्यांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. भाजप जिल्हाध्यक्ष सुधांशु शुक्ला यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

श्याम बहादूर सिंह गौतम यांनी आपल्या पैतृक गावी अखेरचा श्वास घेतला. ते भवसिंहपूर गावाचे माजी सरपंचही होते. अनेकवर्ष त्यांनी सामाजिक कार्य तसेच संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध होता. संघटनेच्या कामासाठी त्यांचे योगदान आणि समर्पण यामुळे परिसरात त्यांचा विशेष आदर होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच भाजप जिल्हाध्यक्ष सुधांशु शुक्ला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी गौतम यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याला उजाळा देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुधांशु शुक्ला म्हणाले की, श्याम बहादूर सिंह गौतम यांचे साधे व्यक्तिमत्त्व, संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि समाजसेवेची बांधिलकी कायमच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांनी आयुष्यभर समाज आणि संघटनेसाठी समर्पित भावनेने काम केले. त्यांच्या निधनाने भाजपने एक निष्ठावान कार्यकर्ता आणि समाजाने एक समर्पित व्यक्ती गमावली आहे.

शुक्ला यांनी दिवंगत आत्म्याला शांती लाभावी तसेच शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या निधनामुळे परिसरातील नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि RSS ने दुःख व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT