ममता बॅनर्जी यांच्याकडून २९१ जागांसाठी उमेदवार जाहीर
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदु अधिकारी यांच्या थेट लढत होणार
भाजपने रणनीती आखत मोठं आव्हान उभं केल्याचे दिसत आहे
तृणमूल काँग्रेसने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीएमसी कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेतून २९१ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या निवडणुकीत स्वत: ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरल्या आहेत. दुसरीकडे भाजपनेही पश्चिम बंगालसाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक चुरशीची होणार आहे. ममता बॅनर्जींना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपने रणनीती आखत नवा डाव टाकला आहे. या नव्या डावात बॅनर्जी अडकणार का, हे पाहावे लागेल.
भाजपनेही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने सुवेंद्र अधिकारी यांना भवानीपूर आणि नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सध्याचे भाजपचे नंदीग्रामचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. तृणमूल काँग्रेसने मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि सुवेंद्रु अधिकारी यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे की, तीन जागा या अनीक थापा यांच्या पक्षासाठी सोडल्या आहेत. टीएमसी २२६ जागांवर जिंकू शकते'. यावेळी त्यांनी भाजपला हटवण्याचाही नारा दिला. भाजप ५० जागा देखील जिंकू शकत नाही, असाही त्यांनी दावा केला आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तातडीने भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपकडून सुवेंदु अधिकारी यांना भवानीपूर आणि नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाकडून उमेदवारी मिळाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून सुवेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.