BJP Saugat-e-Modi Campaign saamtv
देश विदेश

Saugat-e-Modi: ईदनिमित्त भाजपची 'सौगात-ए-मोदी' मोहीम; काय आहे मोदी सरकारची नवी मोहीम?

BJP Saugat-e-Modi Campaign: भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी भाजपची सौगात -ए- मोदी मोहिमेची माहिती दिली. मोदी सरकार देशातील मुस्लीम जनतेसाठी रमजानचा शिधा देणार आहे.

Bharat Jadhav

ईदच्या निमित्ताने भाजप मुस्लीम समाजाला विशेष गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप अल्पसंख्याक मोर्चा देशातील ३२ लाख गरीब मुसलमानांना ईदसाठी 'सौगात ए मोदी' किट देणार असल्याची घोषणा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी केलीय. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी याप्रकरणी माहिती दिलीय.( BJP Saugat-e-Modi Campaign On Eid)

ईद साजरी करण्यासाठी मुस्लिमांना कोणतीच अडचण होऊ नये. यासाठी मुस्लिमांना गिफ्ट दिलं जाणार आहे. यासाठी अल्पसंख्याक मोर्चाचे ३२ हजार पदाधिकारी देशातील ३ हजार मशि‍दींमध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी ३२ लाख गरजू मुस्लीम व्यक्तींना मदत केली जाणार आहे. भाजपचे कार्यकर्ते तेथे जाऊन मुस्लीम व्यक्तींना किट देतील. या किटमध्ये घरातील महिला प्रमुखासाठी खाद्यपदार्थ आणि सूटचे कपडे दिले जातील. तसेच या किटमध्ये शेवया, बेसन, सुका मेवा, दूध, साखर असे पदार्थ असणार आहे.

अल्पसंख्याक समाजातील लोकांपर्यंत पोहोचू आणि मोदी किटचे वाटप करू. या किटचे देशभरात वितरण केले जाणार आहे. या किटचे ३२हजार अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात येणार असून, एक अधिकारी १०० कुटुंबांना भेट घेत त्यांना ही किट देणार असल्याची माहिती जमाल सिद्धिकी यांनी दिली. ईद, गुड फ्रायडे, ईस्टर नवरोज, या सणांच्या दिवशी अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यामातून मोहीम राबवली जाणार आहे.

या सणांच्या काळात गरजू लोकांची भेट घेतली जाईल. जिल्हापातळीवर ईद मिलन समारोहाचे देखील आयोजन केलं जाणार आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले, रमजान महिन्यात गरीब, दुर्बल शेजारी आणि गरीब नातेवाईकांना मदत केली पाहिजे. तसेच गुड फ्रायडे, इस्टर, नवरोज आणि भारतीय नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये मोर्चा यात सहभाग होत सौगात-ए-मोदी किटचे वाटप केले जाणार असल्याची माहितीही सिद्धिकी यांनी दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या निजामुद्दीन इथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. गरीब मुस्लीम कुटुंबाला ईद साजरी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. या अभियानातंर्गत भाजप गरजवंत मुस्लीम समाजापर्यंत पोहचणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात गरीब, गरजूंना मदत करण्यावर भाजपने जोर दिलाय. या मोहिमेमुळे त्यामुळे सांप्रदायिक सलोखा वाढवण्यास मदत होईल असं भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT