PM Narendra Modi News Saam Tv
देश विदेश

PM Modi: 'चहा थंड झाल्यावर लोक कानाखाली मारायचे,'; पंतप्रधान मोदींनी सांगितली लहानपणीची आठवण

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. लहानपणी मोठ्या प्रमाणावर अपमान सहन केल्याचं भाष्य यावेळी त्यांनी केलं आहे.

Rohini Gudaghe

लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं आपण पाहिलं आहे. पंतप्रधान मोदी लहानपणी चहा विकण्याचं काम करायचे, हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. नुकतंच पंतप्रधान मोदींनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना मोदींनी त्यांच्या बालपणीची एक अत्यंत वेदनादायी आठवण सांगितली आहे.

पीएम मोदी म्हणाले (PM Modi Interview) की, लहानपणी आमचं चहाचं छोटसं दुकान होतं. तेथे मी कप आणि प्लेट्स धुवायचो. चहा थंड झाला तरी लोक भडकाचये, अनेकदा कानाखाली देखील मारायचे. मी माझ्या लहानपणी हे सर्व अपमान सहन केले आहेत. त्यामुळे माझी कोणतीही तक्रार नाही, असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हटले आहेत. फक्त राजकारणात आल्यावर नाही तर लहानपणी देखील अपमानाचं आयुष्य जगल्याचं त्यांनी म्हटलं (PM Narendra Modi News) आहे.

सामान्य जीवनात मला अपमान सहन करावा लागला, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. ते नामदार आणि आपण कामदार आहोत. त्यामुळे मला कोणी शिवीगाळ केली तर आश्चर्य वाटत नाही, कारण लहानपणापासून हे सर्व पाहत आणि सहन करत आलो आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. यावेळी बोलताना मोदींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा (Narendra Modi) दिला आहे.

यासोबत मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, संविधानाच्या भावनेचा आदर केला पाहिजे. कारण धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार (BJP News) नाही, असा विचार संविधान बनवताना सर्वानुमते तयार झाला होता. पण आज काँग्रेसला धर्मावर आधारीत आरक्षण द्यायचं आहे, हा संविधानाचा अपमान असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मुलाखतीत बोलताना त्यांनी लहानपणी मोठ्या प्रमाणावर अपमान सहन केल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPATचा वापर शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका | VIDEO

डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

SCROLL FOR NEXT