BJP lok sabha election 2024  AnI
देश विदेश

Lok Sabha Election : तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार'; लोकसभेसाठी भाजपचा नवा नारा

Bharat Jadhav

Teesri Baar Modi Sarkar Ab Ki Baar 400 Paar For Lok Sabha Election :

देशातील ५ राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये विधानसभेमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यापासून भाजप लोकसभेच्या कामाला लागलीय. आज भाजपने आगामी लोकसभेसाठी नवा नारा दिलाय, तिसरी बार मोदी सरकार , अबकी बार ४०० पारचा नारा भाजपच्या नेत्यांनी दिलाय. (Latest News)

लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी हा नारा दिलाय. तसेच या बैठकीत राम मंदिराच्या अभिषेकबाबतही सविस्तर रणनीती आखण्यात आली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President)जेपी नड्डा (JP Nadda), पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत ( elections) भाजपने 'अच्छे दिन आने वाले हैं' असा नारा दिला होता. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपने ' फिर एक बार मोदी सरकार' चा नारा देत मोठा विजय मिळवला होता. असे दमदार नारे देत पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) नेतृत्वाखाली भाजपने लोकसभेच्या दोन्ही निवडणुका जिंकल्या. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ' तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार' असा नारा देण्यात आला आहे.

टीम ८ वाढवणार विरोधकांचं टेन्शन

लोकसभा २०२४ साठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. भाजप नेत्यांनी विविध राज्यात बैठकांचे सत्र चालू केलंय. पक्ष संघटना मजबूत करण्यासह विरोधीपक्षात खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखलीय. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते इतर पक्षातील नाराज नेत्यांवर नजर ठेवून असणार आहेत. दुसऱ्या पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचत त्यांना भाजपात समाविष्ट करण्याची योजना भाजपने आखलीय. यासाठी भाजपने टीम-८ स्थापन केली असून ही टीम विरोधीपक्षांचं टेन्शन वाढवेल असं म्हटलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT