BJP Mp brij bhushan sharan singh's hoarding against raj thackeray
BJP Mp brij bhushan sharan singh's hoarding against raj thackeray Saam Tv
देश विदेश

उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी; अयोध्या दौऱ्याआधीच वातावरण तापलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहराइच : मशिदीवरील भोंगे हटवणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ठाकरे यांनी उत्तरप्रदेशमध्ये भोंगे हटवणाच्या मुद्यावरून योगी सरकारचे भरसभेत कौतुक केले होते. त्यानंतर लवकरच राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. या दरम्यान, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा दिला आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात जागोजागी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. ( brij bhushan sharan singh's hoarding against raj thackeray )

हे देखील पाहा -

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने देशभर चर्चेत आहेत. राज ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांच्या भूमिकेचे राज्यातील अनेक भाजप नेत्यांनी समर्थन केलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी ठाकरेंनी अयोध्येमध्ये येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंना ट्विट मार्फत दिला होता. आता त्याप्रकारची बॅनरबाजी देखील जागोजागी पाहायला मिळत आहे. या बॅनरवर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी असा उल्लेख आहे. त्याचबरोबर माफी न मागितल्यास पुन्हा माघारी जा, असा इशारा खासदार शरण सिंह यांनी दिला आहे. या बॅनरविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

'ट्विट'करून भाजप खासदाराने दिला होता 'हा' इशारा

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शरण सिंह म्हणाले होते की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांनी राज ठाकरे यांना भेटू नये. राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये, असा सल्ला खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.

ठाकरे कुटुंबावर देखील साधला निशाणा

भाजप खासदाराने राम मंदिर आंदोलनामधील ठाकरे कुटुंबाच्या भूमिकेवर टीका केली. यावर ट्विट करत ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, 'राम मंदिर आंदोलन ते मंदिर निर्माणापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सामान्य लोकांची भूमिका महत्वाची होती. मात्र, ठाकरे कुटुंबाचं या आंदोलनाशी काहीच देणे घेणे नाही.'

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT