Tata Steel Factory Fire: टाटा स्टीलच्या प्रकल्पात मोठ्या स्फोटानंतर भीषण आग

जमशेदपूरच्या टाटा स्टीलच्या प्रकल्पात भीषण आग लागली.
Tata Steel Factory Fire
Tata Steel Factory FireSAAM TV

जमशेदपूर: टाटा स्टीलच्या (Tata Steel) प्रकल्पात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. शनिवारी दुपारी साधारण १२ वाजताच्या सुमारास ही आग लागली. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर प्रकल्पाच्या एका भागात आग लागली. सुदैवाने त्या ठिकाणी कुणीही कामगार नव्हते, अशी प्राथमिक माहिती मिळते.

व्हिडिओ पाहा:

टाटा स्टील प्रकल्पात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट केलं आहे. जमशेदपूर येथे टाटा स्टीलच्या प्रकल्पात स्फोट (Blast) झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, टाटा स्टीलचं व्यवस्थापनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलच्या जमशेदपूर येथील प्रकल्पात कोक विभागात मोठा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोक प्लांटमधील बॅटरी नंबर ५, ६ आणि ७ मधील क्रॉस ओव्हरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे गॅस गळती झाली. त्यानंतर आग लागली. या घटनेत एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलच्या जमशेदपूर येथील प्रकल्पात कोक विभागात मोठा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. स्फोटानंतर आगीचा भडका (Fire) उडाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोक प्लांटमधील बॅटरी नंबर ५, ६ आणि ७ मधील क्रॉस ओव्हरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे गॅस गळती झाली. त्यानंतर आग लागली. या घटनेत एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर आगीचा भडका उडताच, सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रकल्पाबाहेर काढण्यात आलं. त्यांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात येत आहे. गॅस गळती थांबवण्याचे काम सुरू आहे. टाटा स्टील व्यवस्थापनानं याबाबत माहिती दिली आहे. जमशेदपूरच्या टाटा स्टील प्रकल्पातील कोक प्लांटमध्ये बॅटरी नंबर सहामध्ये स्फोट झाला. स्फोट आणि आगीनंतर अॅम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना टीएमएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com