BJP MLA Saam TV News
देश विदेश

BJP Leader: भाजप आमदाराला विंडो सीट दिली नाही, समर्थकांनी प्रवाशाला धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

BJP MLA Supporter Assaults Passenger: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सीटच्या वादातून भाजप आमदाराच्या समर्थकांनी प्रवाशाला मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

विंडो सीटवरून झालेल्या वादातून भाजप आमदाराच्या समर्थकांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना झाशी रेल्वे स्थानकावर दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडली. कोचमध्ये जागा बदलण्यावरून बाचाबाची झाली.वाद इतका टोकाला गेला की, आमदाराच्या समर्थकाने कोचमध्ये येऊन प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं काय?

झाशीच्या बबिनाचे आमदार राजीव सिंह पारीछा आपल्या पत्नी आणि मुलासोबत वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. ही एक्सप्रेस दिल्लीहून झाशीच्या दिशेनं जात होती. राजीव सिंह पारीछा यांचा कोचमधील सीट क्रमांक ८ होता. त्यांच्या पत्नी कमली सिंह यांचा सीट क्रमांक ५० होता. तर, त्यांच्या मुलाचा श्रेयांश सिंह याचा सीट क्रमांक ५१ होता. कोचमध्ये जागा बदलण्यावरून एकासोबत त्यांचा वाद झाला.

वाद इतका टोकाला गेला की आमदाराने आपल्या समर्थकांना याची माहिती दिली. झाशी रेल्वे स्थानक आल्यानंतर काही लोक थेट आमदार उपस्थित असलेल्या कोचमध्ये घुसले. तसेच राजकिशोर नावाच्या प्रवाशाला मारहाण केली. मारहाणीदरम्यान नाकातून रक्तस्त्राव झाला. यानंतर ट्रेन थेट भोपाळला रवाना झाली. मारहाणीच्या घटनेनंतर राज किशोर भोपाळमध्ये उतरले.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला. काहींनी व्हिडिओ शेअर करत प्रवाशांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेनंतर प्रवाशाने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

काँग्रेसचे माजी आमदार मुकेश नायक आणि मंत्री रामनिवास रावत यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत भाजप आमदाराच्या समर्थकांवर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT