bareli news  Saam tv
देश विदेश

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप आमदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

BJP mla Death : भाजप आमदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. आमदाराच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

भाजप आमदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आमदार डॉ. श्याम बिहार लाल यांचं निधन

डॉ. श्याम यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील फरीदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. श्याम बिहार लाल यांचं शुक्रवारी निधन झालं. बैठकीत अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. ते मंत्री धर्मपाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला हजर झाले होते. आमदार डॉ. श्याम बिहार लाल यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

त्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉ. श्याम बिहार लाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'जनपद बरेलीच्या फरीदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या निधनाची वार्ता दु:खद आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदवना व्यक्त करतो'.

भाजप कार्यकर्त्याने सांगितले की, 'ते सर्किट हाऊसमध्ये मंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार श्याम बिहारी लाल देखील सहभागी झाले होते. त्यांनी गुरुवारी ६० वा जन्मदिवस साजरा केला'.

भाजप कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, श्याम बिहारी लाल यांची दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तब्येत बिघडली. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. परंतु त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांचा आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला'.

कोण होते डॉ. श्याम बिहार लाल?

डॉ. श्याम बिहारी लाल हे फरीदपूरमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी सियाराम सागर यांचा पराभव केला. तर २०२२ साली झालेल्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या जागेवरून दोनदा विजय मिळवला. राजकारणात येण्याआधी डॉ. श्याम हे रुहेलखंड विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT