पुरग्रस्तांना भेटायला गेलेले 'हे' नेते स्वतःच अडकले, हेलिकॅप्टरने करावं लागलं रेस्क्यु twitter/ @ANI
देश विदेश

पुरग्रस्तांना भेटायला गेलेले 'हे' नेते स्वतःच अडकले, हेलिकॉप्टरने करावं लागलं रेस्क्यु

पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा बोटीनं गेले होते. मात्र ते स्वतःच या पुरात अडकले.नंतर त्यांना हेलिकॉप्टरने रेस्क्यु करण्यात आलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोपाळ : मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) अनेक भागात सध्या पूर परिस्थिती (Flood) आहे. या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री (Home Minister) नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) बोटीनं गेले होते. मात्र ते स्वतःच या पुरात अडकले. त्यानंतर वायुसेनेच्या (IAF) हेलिकॉप्टरने मंत्री महोदयांना रेस्क्यु करण्यात आलं. रेस्क्यु करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (BJP minister narottam mishra airlifted during flood relief and rescue operation in MP)

मध्यप्रदेशच्या दतिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन बचावकार्य चालू आहे. मध्यप्रदेश सरकारमधील गृहमंत्री आणि भाजप नेते नरोत्तम मिश्रा हे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एसडीआरएफच्या बोटीमधून आढावा घेत होते. मात्र एका ठिकाणी त्यांच्या बोटीवर झाड पडल्याने त्या बोटीचे इंजिन बंद पडून ती बोट पाण्यातच अडकली.

हे देखील पहा -

यादरम्यान त्यांनी जवळच्याच एका घराच्या छतावर आसरा घेतला. त्यांच्या चहुबाजूंनी पाणी असल्याने त्यांना तिथून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे वायु सेनेने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने त्यांना वर खेचत रेस्क्यु केले गेले. तसेच त्यांच्यासोबत अन्य नऊ जणांनाही वाचवले गेले.

मंत्री महोदयांच्या रेस्क्युचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काहींनी याला चांगली कामगिरी म्हणत गृहमंत्र्यांचे कौतुक केले आहे तर काहींनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. कॉंग्रेस नेते भुपेद्र गुप्ता म्हणाले की, ''ज्या प्रकारे आपल्या गृहमंत्र्यांनी स्पायडरमॅन प्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला, ते त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्यांसाठी धोकोदायक होते, हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता'' असा आरोप त्यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT