BJP Plan For 2024 Loksabha Elections SAAM TV
देश विदेश

BJP Plan For 2024 Loksabha Elections : नरेंद्र मोदींचा मास्टरप्लान; लोकसभा निवडणुकांआधीच भाजपमध्ये भाकरी फिरणार?

BJP on dynasticism : घराणेशाहीवरून काँग्रेसला सातत्यानं घेरणारा सत्ताधारी पक्ष भाजपमध्येही काही बदल करण्यात येतील, असे संकेत नवी दिल्लीतील बैठकीतून देण्यात आले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

प्रमोद जगताप, नवी दिल्ली

PM Narendra Modi Plan For Loksabha Nivadnuk 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली असून, भाजपनं 'मास्टरप्लान' तयार केल्याचं समजतं. घराणेशाहीवरून काँग्रेसला सातत्यानं घेरणारा सत्ताधारी पक्ष भाजपमध्येही काही बदल करेल, असे संकेत काल, बुधवारी नवी दिल्लीतील बैठकीतून देण्यात आल्याचे कळते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल, बुधवारी नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा 'मास्टरप्लान' तयार असल्याचे सांगितले जाते.(Latest Marathi News)

घराणेशाहीला चाप लावणार?

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं रणनीती आखल्याचे सांगितले जाते. भाजपमधील घराणेशाहीला पंतप्रधान मोदी चाप लावणार असल्याचे सांगितले जाते. तसे संकेतही कालच्या बैठकीतून देण्यात आले आहेत. भाजपच्या सर्वच नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही. त्याऐवजी महिला आणि युवकांना संधी देण्याचा मानस आहे, असे सांगितले जाते. सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांचेही आगामी निवडणुकीत तिकीट कापणार असून, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

त्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी?

पुढील निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून स्वतः नरेंद्र मोदी हे घराणेशाहीवरून विरोधकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. तर विरोधकांनीही भाजपमधील घराणेशाहीवर टीका करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे आता भाजपमधील घराणेशाहीला चाप लावण्याचा विचार केला जाणार आहे, असे सूत्रांकडून समजते.

ज्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. ज्यांची समाजाशी घट्ट नाळ जोडलेली आहे, अशाच काही ठराविक चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळू शकते. पण जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी कशी द्यायची, याबाबतचा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे.

ते जे आदेश देतात, त्याचे पालन केले जाते. युवक, महिलांना संधी देण्याचा हा चांगला निर्णय आहे. यात काहीही गैर नाही.
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सध्या मंत्रिमंडळात भाजपचे असे काही चेहरे आहेत की त्यांच्या कामाचा अहवाल नकारात्मक आल्याचे कळते. त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, असं भाजपनं निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संबंधित मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. तशी यादीही सर्वेक्षणातून समोर आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT