RAJASTHAN LOCAL BODY ELECTION RESULTS: saam tv
देश विदेश

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

Rajasthan Election Results: राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 10 महापालिकांपैकी 5 महापालिकांमध्ये भाजपला यश मिळाले.

Omkar Sonawane

राजस्थानमध्ये आता डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिनचं सरकार झालं आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपने काँग्रेसला मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे. राजस्थानमधील एकूण 309 नगर पालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 9 सप्टेंबर रोजी मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 11 सप्टेंबर रोजी मतदान झालं. या निवडणुकांमध्ये 10 महानगरपालिका, 51 नगरपरिषद आणि 248 नगरपालिकांचा समावेश होता.

दरम्यान, राजस्थानातील 10 महापालिकांमध्येही रंजक स्थिती पाहायला मिळाली आहे. 10 महापालिकांपैकी भाजपने 5 महापालिकांवर झेंडा फडकवला आहे. तर काँग्रेसला एका महापालिकेत यश मिळाले आहे. उर्वरित 4 महापालिकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानातील 252 नगरपालिकांपैकी भाजपने 144 ठिकाणी, काँग्रेसने 92 ठिकाणी, तर अपक्ष उमेदवारांनी 16 ठिकाणी विजय मिळवला आहे. तसेच 47 नगर परिषदांपैकी भाजपला 21, काँग्रेसला 17, तर अपक्ष उमेदवारांना 9 ठिकाणी यश मिळाले आहे.

या निवडणुकीत भाजपच्या यशामागे अनेक प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि पेपरफुटीच्या घटना रोखण्यात आलेले यश यामुळे भजनलाल सरकारला फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोठ्या शहरांमध्ये UGCच्या विरोधाचा परिणाम भाजपच्या कामगिरीवर झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे, काँग्रेसची कामगिरी तुलनेने कमजोर राहिली. भाजपविरोधातील वातावरणावर पक्षाने अधिक अवलंबून राहून निवडणुकीत अपेक्षित सहभाग दाखवला नाही, असे सांगितले जात आहे. तसेच पक्षातील अंतर्गत गटबाजी, NEET पेपरफुटीचा मुद्दा आणि तरुणांच्या प्रश्नांवर पक्षाची शांत भूमिका काँग्रेससाठी नुकसानकारक ठरल्याचे मानले जात आहे.

राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत 4 हजारांहून अधिक प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 3 हजार 450 हून अधिक प्रभागांमध्ये यश मिळाले आहे. दुसरीकडे, 2 हजार 400 हून अधिक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत आपला झेंडा फडकवला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना दिले जात असून त्यांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

SCROLL FOR NEXT