Pm Modi and Amit Shah Saam Tv
देश विदेश

BJP Manifesto 2024 : भाजप उद्या जाहीरनामा जाहीर करण्याच्या तयारीत; लोकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करणार?

BJP Manifesto 2024 Update : लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केला होता. त्यानंतर आता भाजप उद्या १४ एप्रिल रोजी जाहीरनामा जाहीर करण्याची शक्यता आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. तर या लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केला होता. त्यानंतर आता भाजप उद्या १४ एप्रिल रोजी जाहीरनामा जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजप या जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून उपस्थितीत जाहीरनामा जाहीर होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नवरात्रीचा सहाव्या दिवसाचं औचित्य साधून भाजपकडून जाहीरनामा जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' नाव दिले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनेही त्यांचा जाहीरनामा घोषित केला होता. भाजपचा जाहीरनामा अद्याप घोषित झाला नव्हता.

भाजपने स्थापन केली होती समिती

भाजपने या जाहीरनाम्यासाठी समितीची स्थापना केली होती. या जाहीरनाम्याच्या समितीमध्ये अध्यक्ष केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहे होते. या समितीत एकूण २७ जण होते. दीड लाखांहून अधिक जणांनी व्हिडिओच्या माध्यमातून पक्षाला सूचना सूचवल्या होत्या. तर ४० हजार सूचना या नमो अॅपच्या माध्यमातून दिल्या होत्या. अशा एकूण पाच लाख सूचना भाजपला मिळाल्या होत्या.

संकल्प पत्रात काय असणार?

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप जाहीरनाम्यात विकास, विकसित भारत, युवा,महिला , गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच जाहीरनाम्याची थीम 'मोदी की गॅरंटी : विकसित भारत २०४७ ' असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT