Rajya Sabha Saam Tv
देश विदेश

राज्यसभेत भाजपने रचला इतिहास; पहिल्यांदाच खासदारांची संख्या 100 पार

राज्यसभेत भाजपने प्रथमच सदस्यसंख्येचा 100 चा टप्पा ओलांडला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपने प्रथमच सदस्यसंख्येचा 100 चा टप्पा ओलांडला आहे. ही कामगिरी करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. गुरुवारी झालेल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीच्या (election) नुकत्याच झालेल्या फेरीनंतर भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार आता १०१ वर उभे आहेत.

भाजपने इतक्या जागा जिंकल्या

13 पैकी 4 जागांवर विजय मिळवत भाजपने हा पराक्रम गाजवला आहे. ज्यासाठी गुरुवारी मतदान (Voting) झाले आहे. भाजपचा सहयोगी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने आसाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली आहे. आसाम (Assam), त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील 3 राज्यांमधून भाजपने राज्यसभेच्या 4 जागा जिंकल्या आहेत. या भागातून भाजपने राज्यसभेतील (Rajya Sabha) सदस्यांची संख्याही वाढवली आहे.

हे देखील पहा-

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे की, "आसामने एनडीएच्या 2 उमेदवारांना राज्यसभेवर निवडून पंतप्रधानांवर (Prime Minister) विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या पवित्रा मार्गेरिटा 11 मतांनी तर यूपीपीएलच्या रावंगवरा नरझारी 9 मतांनी विजयी झाल्या. विजेत्यांचे अभिनंदन असे ट्विट केले आहे.

भाजपने राज्यसभेत शंभरी पार केली

राज्यसभेत भाजपने 100 चा आकडा पार केल्याने, या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून विरोधक बाहेर फेकले गेले आहेत. आसाममधील राज्यसभेच्या 2 आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. नागालँडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजप उमेदवार आणि त्यांच्या महिला विंगचे प्रदेशाध्यक्ष एस फांगनॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली. ज्यामुळे ती संसदेच्या वरच्या सभागृहात स्थान मिळविणारी राज्यातील पहिली महिला ठरली.

आसाममध्ये काँग्रेसचे रिपुन बोरा आणि राज्यसभेतील राणी नारा यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या विजयानंतर 'आप'ने राज्यातील 5 ही जागा जिंकल्या. आता राज्यसभेत 'आप'च्या जागांची संख्या 8 झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या टप्प्यात काँग्रेसचे संख्याबळ 5 जागांपेक्षा कमी झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT