Buldhana: सरकारी स्वस्त धान्य दुकानदार "ई-पॉस" मशीन केले तहसीलमध्ये जमा

राज्यात लाभार्थ्याना सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचे वितरण करण्यात येते.
Buldhana
Buldhanaसंजय जाधव

बुलडाणा: राज्यात लाभार्थ्याना सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचे वितरण करण्यात येते. धान्य वितरण हे पारदर्शी व्हावे या करिता शासनाने ई- पॉस मशीनच्या (machine) सहाय्याने लाभार्थीचे अंगठे घेऊन धान्य वितरीत करण्यात येत आहे. परंतु, काही दिवसांपासून ई- पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे लाभार्थी (Beneficiaries) व दुकानदार तुफान खडाजंगी पाहायला मिळत आहे.

हे देखील पहा-

यामुळे त्रस्त होऊन बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई- पॉस मशीन घेऊन मोर्चा काढून शेगाव तहसील कार्यालयाला (tehsil office) सर्व ई- पॉस मशीन जमा करण्यात आले आहेत. स्वस्त धान्य दुकानदाराने देण्यात आलेले ई- पॉस मशीन टू जी सपोर्टेड असल्याने आणि वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद- विवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Buldhana
पुष्पा फ्लावर नही ''बोकड'' है मैं ! दीडशे किलो आणि साडेपाच फुटांचा पुष्पा...(पहा Video)

यासाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारानी ३१ मार्चपर्यंत या अडचणीवर उपाय शोधावा. अन्यथा १ एप्रिल २०२२ पासून सर्व दुकानदार आपल्या ई- पॉस मशिन आप-आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करतील अशा आशयाचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी यांना शासनाकडे दिले होते. त्यानुसार आज बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई- पॉस तहसील कार्यलयाला जमा केले आहेत. तत्पूर्वी या ई- पॉस मशीनची तिरडीद्वारे मिवरवणूक काढण्यात आली.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com