BJP LEADERS JOIN SAMAJWADI PARTY saam tv
देश विदेश

भाजपला सर्वात मोठा धक्का! दोन बड्या नेत्यांसह नेते-पदाधिकाऱ्यांचा 'सपा'त प्रवेश

UP Elections : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 पूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजीव खन्ना आणि मनमोहन सैनी यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात घडामोडीना वेग आला आहे. भाजप नेते राजीव चन्ना आणि मनमोहन सैनी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. अशातच राजीव चन्ना आणि मनमोहन सैनी यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशाकडे मुरादाबाद नगर मतदारसंघातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मात्र समाजवादी पक्षाने अद्याप या जागेसाठी अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.

मुरादाबादमधील भाजपचे माजी आमदार राजीव खन्ना यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून तयांच्यासोबत भवानी शुक्ला यांनी आपल्या पाच मुलांसह सपाचे सदस्यत्व स्वीकारले. भवानी शुक्ला यांच्या मुलांची नावं श्रीकृष्ण भगवान शुक्ला, शिव भगवान शुक्ला, शंकर भगवान शुक्ला, विष्णू भगवान शुक्ला आणि राम भगवान शुक्ला अशी आहेत.

या पक्षप्रवेशादरम्यान समाजवादी पक्षाच्या कार्यालयात ‘जय भवानी, जय अखिलेश’ अशा घोषणाही देण्यात आल्या. राजीव खन्ना हे उत्तर प्रदेशचे मुरलेले राजकारणी आहेत. 2007 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर मुरादाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते निवडून ही आले होते.

सपातून भाजपमध्ये आणि आता पुन्हा सपामध्ये; मनमोहन सैनी यांची घरवापसी?

मनमोहन सैनी यांचाही समाजवादी पक्षाशी आधीपासून संबंध राहिला आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी पुन्हा समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Imran Khan: इम्रान खानला देश सोडून जाण्याचे आदेश का मिळाले? अभिनेता नक्की कोणत्या देशाचा नागरिक आहे?

Milk Tea Vs Black Tea: दुधाचा की कोरा, आरोग्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून यवतमाळमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Maharashtra Politics: सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी खरंच शिंदेसेनेत प्रवेश केला का? स्वत: सांगितले सत्य

नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

SCROLL FOR NEXT