bjp leader death news Saam tv
देश विदेश

दोन गटात वाद पेटला; भाजप नेत्याची बेदम मारहाण करून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

bjp leader kills : भाजप नेत्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

उत्तराखंडमध्ये घडली धक्कादायक घटना

भाजप नेत्याची बेदम मारहाण करून हत्या

भाजप नेत्याच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडची राजधानी देहारादूनच्या बैरागीवाला गावात भाजप नेते विनोद यांची बेदम मारहाण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहसपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेनंतर दोन गटात वाद पेटलाय. एका गटाने आरोपींच्या घरावर दगडफेक केली आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. पोलिसांकडून बुलडोझर कारवाई केल्यानंतर लोकांचा संताप शांत होईना झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद, राजेश आणि अशोक यांचा माजी सरपंच इश्तिपक यांचा पुतण्या इम्तियाज याच्याशी बोअरवेलमधून पाणी काढण्यावरून वाद झाला. रझ्झाक, अमन, युनूस आणि अनीस यांच्यासह ४० जणांच्या जमावाने धारदार शस्त्रांनी विनोदच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत विनोद, त्यांचा भाऊ अशोक, राजेश आणि वहिनी सुषमा गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विनोद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनोद यांचे दोन भाऊ आणि वहिनींवर उपचार सुरू आहेत. विनोद यांच्या मृत्यूची वार्ता कळताच गावात वातावरण तापलं. पोलिसांच्या कारवाईवर नाराजी दर्शवत गावातील एका गटाने आरोपींच्या घरावर दगडफेक केली. ग्रामस्थांनी आरोपींच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची मागणी केली.

आरोपींच्या घरावर बुलडोझर फिरवल्यानंतरही गावात लोकांचा संताप कमी होत नाहीये. मृत विनोद यांचा भाऊ अशोक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ आरोपींसहित ३० ते ३५ अज्ञात लोकांवर हत्या, हिंसाचारासहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या एफआयरमध्ये रज्जाक , इम्तियाज, अमन, युनूस, शाहबाज, शराफत अली, मासूम, आदिल, शमून, सलमान, जावेद आणि इंतजार यांच्या नावाचा समावेश आहे.

पोलीस अधिकारी प्रमेंद्र डोभाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांच्या हत्या प्रकरणात रज्जाक, सलमान, जावेद आणि शहबाज या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी गावात नाकाबंदी लावली आहे. या प्रकरणानंतर जनतेला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केलं आहे. सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच स्थानिक रहिवाशांना शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT