bjp leader  Saam tv
देश विदेश

Attack on Bjp Leader : भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; कारवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ, VIDEO

Attack on Bjp Leader in West bengal : भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. नेत्याच्या कारवर दगडफेक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड

भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला

अज्ञातांच्या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या

भाजप नेत्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठं वृत्त हाती आलं आहे. भारतीय जनता पक्षाचे शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुरक्षा असताना भाजपचे वरिष्ठ नेत्यावर हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप नेते शुभेंदू यांच्या ताफ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या. शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात भाजपकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

भाजप नेते शुभेंदू अधिकारी हे काही आमदारांसोबत मंगळवारी दुपारी ताफ्यासोबत पोलीस अधीक्षकांच्या भेटीला निघाले होते. त्याचवेळी खगराबाडीजवळ काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजप नेत्याच्या ताफ्यावर चपला, दगडफेक केली.

अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत ताफ्यातील अनेक गाड्यांचा काचा फुटल्या आहेत. यात एका पोलिसांच्या वाहनाचाही समावेश आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी रस्त्यावर ताफ्याचा विरोध करणाऱ्यांना मागे ढकललं.

पश्चिम बंगालचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी हल्ल्यासाठी ममता सरकारला जबाबदार धरलं आहे. हल्ला करण्याचं षडयंत्र आधीच रचल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसने आरोप फेटाळले

तृणमूल काँग्रेसने भाजपच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटलं की, पश्चिम बंगाल सरकारला बदनाम करण्यसाठी भाजपने स्वत:च बनाव रचला. भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. त्यामुळे हल्ला झाला आहे, असा तृणमूल काँग्रेसने दावा केला आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजपमधील इतर कार्यकर्ते पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचले. या कार्यालयात अधिकारी यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

Maharashtra Live News Update: आगळगावात चांदणी नदीच्या पूरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या इसमास तरुणांनी वाचवले

Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT