Varanasi BJP leader Sunil Sharma death news saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याने संपवलं जीवन; मृतदेहाला पक्षाच्या झेंड्यात लपेटून अंत्यविधी, राजकारणात मोठी खळबळ

BJP Leader Sunil Sharma Dies By End Life In Varanasi: वाराणसीच्या सिद्धगिरी बाग परिसरात भाजप नेते सुनील शर्मा यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. ते काशी विश्वनाथ मंडळाचे उपाध्यक्ष होते. पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू असून प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेश: वाराणसीच्या सिद्धगिरी बाग परिसरात शुक्रवारी रात्री भाजप नेते सुनील शर्मा उर्फ मुशी यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. ते काशी विश्वनाथ मंडळाचे उपाध्यक्ष होते. पोस्टमार्टमनंतर लक्सा पोलिसांनी त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. प्रथमदर्शनी या घटनेमागे कौटुंबिक कारणे असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशी विश्वनाथ गल्लीत मान मंदिराजवळ राहणाऱ्या सुनील शर्मा यांनी 2015 मध्ये घटस्फोटीत महिलेशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते पत्नी आणि तिच्या दोन मुलीसह सिद्धगिरी बाग येथील भाड्याच्या घरात राहत होते. विश्वनाथ गल्लीत त्यांचे खेळण्यांचे दुकान होते. तसेच ते साडीचा व्यवसाय करत होते.

शुक्रवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, सुनील शर्मा यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमार्टम करण्यात आले असून आत्महत्येच्या कारणांचा तपास केला जात आहे. मात्र, प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉक्रोच जनता पार्टीची मुंबईतही आंदोलनाची हाक

Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार! 'या' ६ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Breast Cancer : महिलांनो ब्रेस्ट दुखणं सामान्य नाही; कॅन्सरचा असू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या ६ लक्षणे?

Sunday Horoscope : देवीच्या कृपेने पैसा वाढवण्याची मोठी संधी मिळेल, ६ राशींनी राहा सावध; वाचा रविवारचे राशीभविष्य

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT