देश विदेश

भाजप नेत्याकडून PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष; ५०० वाहनांचा ताफा काढून केलं शक्तिप्रदर्शन, VIDEO

bjp saubhagya singh news : भाजप नेत्यालाच PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा विसर पडलाय. भाजप नेत्याने ५०० वाहनांचा ताफा काढून शक्तिप्रदर्शन केलं आहे.

Vishal Gangurde

देशभरात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पीएम नरेंद्र मोदींकडून इंधन जपून वापरण्याचे आवाहन

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाकडे भाजप नेत्याचे दुर्लक्ष

देशभरात पेट्रोल आणि डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केलं आहे. इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन पीएम मोदींनी केलं. मात्र, पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचा भाजप नेत्यालाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.

मध्य प्रदेशात भाजप नेत्याने केलेले शक्तिप्रदर्शनामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उज्जैनचे भाजप नेते सौभाग्य सिंह ठाकूर यांची मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. या मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी सौभाग्य सिंह ठाकूर यांनी शक्तिप्रदर्शन केलं.

भाजप नेते सौभ्याग्य सिंह यांनी ५०० वाहनांचा ताफा काढून शक्तिप्रदर्शन केलं. सौभाग्य सिंह यांच्या शक्तिप्रदर्शनाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा काढल्याने उज्जैन ते भोपाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुले कडक उन्हात सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

राजधानी भोपाळमधील भाजप कार्यालय ते पाठ्यपुस्तक मंडळ कार्यालय, डीबी मॉल आणि अरोरा हिल्सपर्यंत वाहनांच्या लांबच लांब लागल्याचा दिसून आल्या. समर्थकांच्या गाड्यांमुळे रस्तावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.

शक्तिप्रदर्शनावरून काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेसने सोशल मीडियावरून मोदी सरकार टीका केली आहे. काँग्रेसने पोस्ट करत म्हटलं की, 'नरेंद्र मोदी हे पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करण्याचं आवाहन करत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेतेच त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT