Saam Tv
दुसरी व्यक्ती जांभई देताना पाहिल्यावर आपल्यलाही जांभई येते. याला संसर्ज जन्य जांभई म्हणतात.
समोरची व्यक्ती जांभई देताना दिसली की मेंदू त्या कृतीची नोंद घेतो. त्यामुळे नकळत त्याच कृतीची प्रतिक्रिया म्हणून आपल्या शरीरात निर्माण होऊ शकते.
कुटुबांतील व्यक्ती, मित्र किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला जांभई देताना पाहिल्यावर अशी प्रतिक्रिया अधिक जांभई येते. एकमेकांसोबत सतत राहित असल्याने जांभई येऊ शकतात.
कधी कधी जांभई बद्दल नुसता विचार जरी केला तरी काही लोकांना जांभई येते.
दुसऱ्याला जांभई देताना पाहून जांभई येणे काही आजाराचे लक्षण नसते. ही मेंदू आणि शरीराशी संबंधित नैसर्गिक प्रक्रिया आहे.
आपण दिवसभरात खूप दमलेले असतो, व्यवस्थित झोप झालेली नसते, अश्यावेळी जांभई येण्याचे प्रमाण अधिक असते.
जांभई आल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन शरीरात जातो.त्यामुळे ब्लड फ्लो वाढू लागतो आणि न्युरॉन्स अॅटिव्ह होतात.
जांभई मेंदूची सिस्टिम कूल राहण्यास मदत होते. जांभई घेतल्यामुळे शरीराला खूप ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे तापमान मर्यादित राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.