Saam Tv
कधी नारळ फोडल्यानंतर थोडाच भाग जेवणासाठी वापरला जातो. मग उरलेला नारळ खराब होतो. कापलेला नारळ योग्यपद्धतीने साठवला जात नाही म्हणून त्याचा स्वाद आणि ताजेपणा लवकर कमी होतो. मात्र काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही नारळ जास्त काळ टिकवून ठेवू शकता.
नारळ फोडल्यानंतर तो बराच वेळ स्वयंपाकघरात किंवा बाहेर ठेवणे टाळा. नारळाचा गर कापल्यानंतर त्याचा हवेशी संपर्क वाढतो म्हणून तो लवकर खराब होतो. त्यामुळे उरलेला नारळ शक्य तितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवा.
नारळाचा गर सालीसह ठेवण्याऐवजी तो वेगळा करून साठवू शकता. गराचे छोटे तुकडे करून स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे नारळ व्यवस्थित राहिल.
कापलेला नारळ उघड्या प्लेटमध्ये ठेवण्याऐवजी एअरटाईट डब्यात ठेवा. डबा स्वच्छ आणि पुर्णपणे कोरडा असावा. झाकण व्यवस्थित बंद केल्यामुळे नारळाचा बाहेरील हवा आणि फ्रिजमधील इतर पदार्थांच्या वासाशी संपर्क कमी होतो.
जर पुढील काही दिवसांमध्ये नारळाचा वापर करणार असाल तर तो किसून एअरटाईट डब्यात ठेवण्याचा पर्याय आहे. मात्र किसलेला नारळ ओलसर होणार नाही याची काळजी घ्या. वापरण्यापूर्वी त्याचा वास आणि रंग तपासून घ्या
नारळ काही दिवसांसाठी जास्त काळ साठवायचा असेल तर फ्रिजरचा पर्याय उपयोगी ठरू शकतो.नारळाचे तुकडे किंवा किसलेला नारळ फ्रिजर - सेफ पिशवी किंवा डब्यात भरून फ्रिजरमध्ये ठेवा.
नारळ काढताना नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. ओलसर हात किंवा चमचा वारंवार डब्यात घातल्याने नारळामध्ये अतिरिक्त ओलावा जाऊ शकतो. त्यामुळे नारळ खराब होऊ शकतो.
नारळ फोडल्यानंतर उरलेले नारळपाणीही योग्य पद्धतीने साठवता येते. ते स्वच्छ, झाकण असलेल्या बाटलीत किंवा कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. मात्र तेही जास्त काळ साठवून न ठेवता लवकर वापरणे चांगले.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.