Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाला पहिला नवस कुणी केला होता? जाणून घ्या गणरायाची रंजक काहाणी

Shruti Vilas Kadam

लालबागचा राजा

मुंबईतील लालबाग परिसरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची विशेष ओळख आहे.

Lalbaugcha Raja | Twitter

लालबागच्या राजाची स्थापना कधी झाली?

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३४ मध्ये झाली. लालबाग मार्केटच्या जागेचा प्रश्न सुटल्यानंतर गणपतीची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Lalbaugcha Raja | Twitter

३पहिला नवस कोणी केला?

उपलब्ध माहितीनुसार, लालबागच्या राजाला पहिला नवस लालबाग परिसरातील मच्छीमार आणि व्यापारी समाजाने केला होता, अशी मान्यता आहे. बाजाराची जागा मिळावी यासाठी त्यांनी गणपतीला साकडे घातल्याचे सांगितले जाते.

Lalbaugcha Raja | Social Media

नवसाला पावणारा गणपती अशी ओळख

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती वाढत गेली. त्यामुळे मुंबईसह देशभरातून भाविक येथे नवस फेडण्यासाठी येऊ लागले.

Lalbaugcha Raja | Saam tv

बाजाराच्या जागेशी आहे संबंध

लालबाग परिसरातील मच्छीमार आणि व्यापाऱ्यांना बाजारासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, अशी इच्छा होती. गणपतीसमोर प्रार्थना केल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाल्याची श्रद्धा आहे.

Lalbaugcha Raja

नवसाची परंपरा आजही कायम

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. अनेक भक्त नारळ, फुले किंवा इतर वस्तू अर्पण करून आपल्या मनोकामनेसाठी नवस बोलतात.

Lalbaugcha Raja | Lalbaugcharaja Facebook

नवस फेडण्यासाठी देशभरातून भाविक

गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजा पाहण्यासाठी मोठी रांग लागते. नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि श्रद्धेने नवस फेडतात.

Lalbaugcha Raja | Saam Tv

Matar Paneer Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेलस्टाईल मटार पनीर, वाचा रेसिपी

Matar Paneer Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा