Matar Paneer Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेलस्टाईल मटार पनीर, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

पनीरचे चौकोनी तुकडे, हिरवे मटार, कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि आवश्यक मसाले तयार ठेवा.

Matar Paneer Ingredients | yandex

पनीर परतून घ्या

कढईत थोडे तेल किंवा तूप गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Matar Paneer

ग्रेव्ही तयार करा

कढईत तेल गरम करून कांदा, आले आणि लसूण परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

Matar Paneer Curry

मसाले घाला

हळद, लाल तिखट, धणे-जिरेपूड आणि गरम मसाला घालून मिश्रण चांगले परतून घ्या.

Dhaba Style Matar Paneer | yandex

मसाला वाटून घ्या

तयार झालेले मिश्रण थोडे थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यामुळे ग्रेव्ही छान मऊ होईल.

मटार आणि पनीर शिजवा

ग्रेव्हीमध्ये मटार आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून काही मिनिटे शिजवा. नंतर पनीरचे तुकडे घाला.

गार्निश करून सर्व्ह करा

शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून भाजी सजवा. गरमागरम मटार पनीर रोटी, नान किंवा जीरा राइससोबत सर्व्ह करा

Matar Paneer

Face Care: रोज मेकअप करता? मग चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरा हा घरगुती क्लींजर, स्किन दिसेल नेहमी ग्लोइंग

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा