BJP Leader Shot Dead Saam Tv
देश विदेश

BJP Leader Shot Dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी घरासमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

Crime News: संध्याकाळी घरासमोर फिरत असताना भाजपच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी धाडधाड गोळ्या झाडल्या. ३ गोळ्या शरीरात घुसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या भाजप नेत्याचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आली

  • घरासमोर फिरत असताना चौघांनी त्यांच्यावर गोळीबार गेला

  • ३ गोळ्या भाजप नेत्याच्या शरीरात घुसल्या

  • गोळीबारामध्ये भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला

बिहारमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी भाजप नेत्याच्या घराजवळ ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भाजप नेत्याचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. रुपक कुमार (३० वर्षे) असं या भाजप नेत्याचे नाव होते. रुपक कुमार भाजपचे बूथ अध्यक्ष होते. घराबाहेर फिरत असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी बिहारच्या समस्तीपूरमध्ये ही घटना घडली. खानपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शादीपूर घाटाजवळील घराबाहेर रूपक कुमार फिरत होते. त्याचवेळी त्या ठिकाणी दुचाकीवरून चार जण आले. हल्लेखोरांनी रूपक यांच्यावर गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. रूपक यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. तीनपेक्षा जास्त गोळ्या रुपक यांच्या शरीरात घुसल्या.

गोळीबारामध्ये रूपक गंभीर जखमी झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. याठिकाणी डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रूपक यांच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रुपक यांच्या हत्येचे नेमके कारण समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रुपक कुमारच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, रुपक हे भाजप संघटनेत बूथ अध्यक्ष म्हणून काम करत होते. रूपक यांचा भाऊ दीपक साहनी हे देखील भाजपचे काम करतात. ते भाजप समितीचे मीडिया प्रभारी म्हणून काम करतात. रूपक यांचा गावातील काही लोकांशी वाद झाला होता आणि हेच त्याच्या हत्येमागे कारण असू शकते असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. रुपक यांच्या कुटुंबियांनी असे देखील सांगितले की, रूपक यांचे पप्पू चौधरी नावाच्या व्यक्तीशी वाद होता. जो जनता दल युनायटेडशी संबंधित आहे. रुपक यांची हत्या झाल्याच्या घटनेपासून तो फरार आहे. पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

Pune: 'येथे कचरा टाकणारा गाढव अन्...', पुणेरी बॅनरची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी संतप्त

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

SCROLL FOR NEXT